नको टाळू अशी सखे, नको टाळू पुन्हा पुन्हा
मन येई तुझ्या मागे, त्याचा एवढाच गुन्हा
तुला टाळण्याचा छंद, मला भाळण्याचा छंद
जीव जाळून जाळून, तुला जाळण्याचा छंद
किती टाळलेस तरी, तुला शोधत येईन
तुझ्या एका भेटीसाठी, जन्म शेकडो घेईन
जन्म शेकडो घेईन, झाल सोबती सारण
तुझ्या 'हो' कारासाठी, लाख झेलीन मरण
मरणाची परवा नाही, सरणाची आग नाही
मला नकार दिलास, तरी तुझा राग नाही
तुला बोललो मी काही, सार मनात असू दे
भेट वादळाशी झाली, अस ध्यानात असू दे
कधी ओठात येऊ दे, वेड्या या वादळाच नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||६||
No comments:
Post a Comment