Nov 8, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - ५

तुला दुरून पाहिलं, कधी झुरून पाहिलं
तुझ्या डोळ्यातील रूप, हाती घेऊन पाहिलं
तुझा देह चंदनाचा, तुझी चंदनाची काया
तुझा पदर उडतो, जणु आभाळाची छाया
तुझ्या रूपाचा दरारा, जणु वाघीण चालली
सार शहारल रान, जशी नागीण चालली
तुझी चाल नागिणीची, माझ थरारात मन
तुझा पदर धरून, माझ थरारात मन
तुझा पदर चावट, त्यान वळून पाहिलं
मीही वळून पाहिलं, जरा जाळून पाहिलं
सांग जाळु असा किती, सांग जाळणार किती ?
रोज टाळतेस पुन्हा, सांग टाळणार किती ?
तुझी हौस टाळण्याची, माझ्या उरामध्ये घाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||५||

No comments:

Post a Comment