तुला भेटलं साजणी, पहा वादळही अस
त्याच्या मनात तुफान, मन तुझ्यासाठी पीस
त्याची मोल तुला नाही, त्याची जाण तुला नाही
कस वागाव कुणाशी, याच भान तुला नाही
तुझ कोवळस वय, तुझी कोवळी जवानी
अशी कोवळी जवानी, दुनियेच नाही खर
लाख मोलाची जवानी, नको सोडू वार्यावर
असा उफाळला देह, अंग अंग झाले खुले
उगा कशाला मातीत, उधळावी फळे फुले
हाती जीवाची परडी, जीव शहारून आला
तुझी फुले वेचू जाता, देह चंदनाचा झाला
माझ्या प्रितीच अंकुर, तुझ्या अंगणात लाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||७||
No comments:
Post a Comment