चारोळ्या

आयुष्याचं ध्येय ठरवताना “६-५-४-३-२-१” या क्रमाने विचार करावा:
६ आकडी पगार,
५ खोल्यांचा फ्लॅट,
४ चाकी गाडी,
३ दिवसांची मस्त सुट्टी,
२ झकास मैत्रिणी आणि
१ साधी-सरळमार्गी बायको!
=================================
प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
प्रेमात म्हणे माणुस आ॑धळा होतो,
मग एवढ जीवावर उठण्यापेक्षा तो प्रेमच का करतो….!
=================================
एकदा एक वेडा प्रेमाची कहाणी सा॑गत सुटला,
झुरता झुरत म्हणे मरणाच्या उ॑भरठ्यावर येउन ठेपला..
एवढ काय गुपित आहे त्या झुरण्यात मी त्याला विचारल..
म्हणाला, “प्यार मे हम जान दे॑गे” हा ठराव पास झाला होता.
=================================
वाट पाहता पाहता तुझी ,
संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली …
=================================
तू सोबत असली की ,
मला माझाही आधार लागत नाही.
तू फक्त नेहमी सोबत रहा ,
मी दुसर काही तुझ्याकडून मागत नाही ..
=================================
तुझ्यापासून दूर राहण म्हणजे ,
क्षनाक्षनाला मरने होय.
डोळ्यातले अश्रु डोळ्यातच ठेउन ,
मनातल्या मनात रडने होय ….
=================================
खुप वेळेस तुझ्या आठवणी ,
पाउल न वाजवताच येतात.
आणि जाताना मात्र ,
माझ्या मनाला पाउल जोडून जातात.
=================================
तुझा नाजुक असा चेहरा ,
डोळ्यासमोरून हलत नाही.
जसा अंधारात पेटत्या ज्योतीला,
प्रकाश सोडून जात नाही….
तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,
म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!
=================================
प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!
=================================
तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!
=================================
माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!
=================================
बायकोच्या माहेरी सहसा
मी कधी जात नाही
माकडाच्या हाती रेशिम
टोमणा मला आवडत नाही!
=================================
खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्यातरी
आपल्याच विश्वात रमणारं!