Nov 2, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव - 3

एक कोवळी पाकळी, झाली हळुच तरुण
ऊन पीवळे पीवळे, कोणी सांडले वरुन
उन पीवळे पीवळे, झाली सोनीयाची काया
बंध काचोळीचे मग, हळु लागले तुटाया
देह देहात दाटला, अंग अंग फुटू आले
जणु मायेच्या दाराशी, परब्रम्ह भेटु आले
आला हळुच कोठुन, एक मदनाचा झोका
कळी लाजली लाजली, चुके हृदयाचा ठोका
एक नाजुक पाकळी, मग भरदार झाली
साध्या परकारावरी, साडी रेशमाची ल्याली
साडी नेसली पाकळी, मन माझे झाले वेडे पीसे
मला पाकळीच्या जागी, सखे तुझे रुप दीसे
कुणी म्हणो तुला काही, कुणी देवो काही नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||३||

2 comments: