Oct 25, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव - २

माझी भोवऱ्यात नाव, वर वादळाची भीती
तुझ्या हाकेवरी गाव, वाट पहायची किती
वाट पाहता पाहता, जीव झाला पाणी पाणी
माझी हाक अजुनही, नाही गेली तुझ्या कानी
माझी हाक नाही तुला, तुझी हाक नाही मला
जीव वराहाच्या डोई, थेंब थेंब जळालेला
जीव थेंब थेंब जळे, मन राख राख झाले
राख झालेल्या मनाला, पुन्हा कोंब कसे आले ?
प्रश्न डोहाचाही नाही, प्रश्न थेंबाचाही नाही
प्रश्न डोहाचाही नाही, प्रश्न थेंबाचाही नाही
जळणाऱ्या जिवासवे, कोण येणार सोबती
दुनियेचा नको मला साथ, तुझी हवी होती
मुक्या मनाच मागण, तुला कितीदा सांगाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||२||

2 comments: