Dec 20, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - ११

तुझी जीभ गुलू-गुलू, तुझ्या ओंठासवे बोले
मला पाहून डोंघांच, सदा काहीतरी चाले
काहीतरी चाले सखे, त्याचं सदा हितगुज
तुझ्या ओंठावर नाही, सखे नियंत्रण तुझ
तुझ नियंत्रण नाही, ओंठ लाडावले फार
त्यांच्या अश्या वागण्याने, मला बसे मुका मार
बसे मुका मार असा, जातो खोलवर घाव
घाव दाखवू कोणाला, दुख कोणाला सांगाव
कुणा सांगता येईना, मुक्या प्रेमाचे बखेडा
लोक म्हणतील वेडे, झालो तुझ्या साठी वेडा
लोक रिकामटेकडे, नको तिथ घाले बोट
वेडा कुणामुळे झालो, सांग तूच खर खोट
तुझ्यावाचून कोणाला, माझ गुपित कळावं
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||११||

Dec 15, 2010

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत...

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत – १
पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
आयुष्यात – - प़ेम केल होत – २
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
आयुष्यात – - प़ेम केल होत – ३
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
आयुष्यात – - प़ेम केल होत – ४
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
आयुष्यात – - प़ेम केल होत – ५
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत
आयुष्यात – - प़ेम केल होत – ६
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत
आयुष्यात – - प़ेम केल होत – ७

Dec 13, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - १०

तुझ्या गालावरी बट, कशी भुरू भुरू उडे
तुचे पाहुनिया चाल, माझा जीव तडफडे
तुझ्या गालावरी बट, आहे भारी हलकट
पाही माझ्याकडे आणि, करी ओंठाशी लगट
तुही तिलाच सामील, तिला ओंठाला लावते
मला जाळते कशाला, मला कशाला दावते
तुझे गाल तुझ्यापाशी, तुझे ओंठ तुझ्यापाशी
सार तुझे आहे तरी, नको करू मनोमनी
सखे प्रेमामध्ये अशी, करू नये बेईमानी
सखे कुणावर असा, करू नये अत्याचार
तुझ्या गालांना विचार, तुझ्या ओंठाना विचार
तेही घेतील साजणी, माझ एकट्याच नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||१०||

Dec 6, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - ९

तुझ हसण सजणी, जणू नक्षत्रांच लेन
त्याच्यापुढे दुनियेशी, मला नाही देन घेण
सखे हसतेस तेव्हा, पडे चांदण्यांचा सडा
असा बहरून आला, तुझ्या रूपाचा केवडा
तुझ हसण सजणी, तन मन जागवित
तुझ्या हसण्यात गीता, हसण्यात भागवत
तुझ हसण सजणी, नाही तसं साधसुध
लोक झेलतात जसा, कोळ्या देवीचा प्रसाद
तुझे हसतात ओठ, तुझे डोळेही हसती
देव तुझ्या हसण्याची, वाट पाहत बसती
नाही कुणावर दोष, नाही कुणावर टीका
तुझ्या हसण्याच्या पुढे, सखे स्वर्ग फिका फिका
माझा स्वर्ग तुझ्या पायी, तुझ्यावर माझी धाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||९||

Nov 29, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - ८

तुझ्या पायात पैंजण, तुझ्या हातात कंगण
नाद आला पैंजणाचा, वेड झाल अंगण
माझ्या मनाच्या अंगणी, एक लावली तुळस
तुझ्या रुपात साजणी, मला भावली तुळस
तुळशीचे पुण्या भारी, तुळशीचा गंध भारी
मला तुझा छंद भारी, तुझा सहवास भारी
तुळशीच्या पुण्याईने, माझ भरत अंगण
मन घाली प्रदक्षिणा, फेर धरत अंगण
अंगणात येता येता, तुझा चेहरा दिसला
सखे लाजला गुलाब, सखे मोगरा हसला
पैंजणाची रुण-झुन, गुण गुणे नसातून
माझ घरदार कस, सखे आल मोहरून
सदा माझ्या अंगणात, तुझ पैंजण वाजाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||८||