Nov 29, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - ८

तुझ्या पायात पैंजण, तुझ्या हातात कंगण
नाद आला पैंजणाचा, वेड झाल अंगण
माझ्या मनाच्या अंगणी, एक लावली तुळस
तुझ्या रुपात साजणी, मला भावली तुळस
तुळशीचे पुण्या भारी, तुळशीचा गंध भारी
मला तुझा छंद भारी, तुझा सहवास भारी
तुळशीच्या पुण्याईने, माझ भरत अंगण
मन घाली प्रदक्षिणा, फेर धरत अंगण
अंगणात येता येता, तुझा चेहरा दिसला
सखे लाजला गुलाब, सखे मोगरा हसला
पैंजणाची रुण-झुन, गुण गुणे नसातून
माझ घरदार कस, सखे आल मोहरून
सदा माझ्या अंगणात, तुझ पैंजण वाजाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||८||

No comments:

Post a Comment