Dec 20, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव - ११

तुझी जीभ गुलू-गुलू, तुझ्या ओंठासवे बोले
मला पाहून डोंघांच, सदा काहीतरी चाले
काहीतरी चाले सखे, त्याचं सदा हितगुज
तुझ्या ओंठावर नाही, सखे नियंत्रण तुझ
तुझ नियंत्रण नाही, ओंठ लाडावले फार
त्यांच्या अश्या वागण्याने, मला बसे मुका मार
बसे मुका मार असा, जातो खोलवर घाव
घाव दाखवू कोणाला, दुख कोणाला सांगाव
कुणा सांगता येईना, मुक्या प्रेमाचे बखेडा
लोक म्हणतील वेडे, झालो तुझ्या साठी वेडा
लोक रिकामटेकडे, नको तिथ घाले बोट
वेडा कुणामुळे झालो, सांग तूच खर खोट
तुझ्यावाचून कोणाला, माझ गुपित कळावं
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||११||

No comments:

Post a Comment