तुझ्या गालावरी बट, कशी भुरू भुरू उडे
तुचे पाहुनिया चाल, माझा जीव तडफडे
तुझ्या गालावरी बट, आहे भारी हलकट
पाही माझ्याकडे आणि, करी ओंठाशी लगट
तुही तिलाच सामील, तिला ओंठाला लावते
मला जाळते कशाला, मला कशाला दावते
तुझे गाल तुझ्यापाशी, तुझे ओंठ तुझ्यापाशी
सार तुझे आहे तरी, नको करू मनोमनी
सखे प्रेमामध्ये अशी, करू नये बेईमानी
सखे कुणावर असा, करू नये अत्याचार
तुझ्या गालांना विचार, तुझ्या ओंठाना विचार
तेही घेतील साजणी, माझ एकट्याच नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझ इवलंस गाव ||१०||
No comments:
Post a Comment