का मी तुला देवाकडे पुन्हा मागतो आहे ?
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?
मलाही कळतंय आता
तुला नकोसा झालाय माझा सहवास
अन मला एकटं सोडून
तू सुरू केलाय जीवनाचा प्रवास
या प्रवासात तुझ्यासंगे येण्याचे मीही स्वप्न पाहतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?
खूप विश्वास होता तुझ्यावर
अन तेवढेच प्रेमही केले
तू मात्र काहीच विचार न करता
मला तुजपासुन दूर केले
तुझ्या परतण्याची वाट , मी अजूनही बघतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?
आता कस सांगू तुला
हे प्रेम म्हणजे काय असत
यात विरहाचे दुःख पचवणं
वाटत तेवढं सोपं नसत
प्रत्येक श्वासागणिक मी अधिकाधिक प्रेम करतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?
तुझा तो नकार ऐकून
रस्त्याकाठचा दिवाही बंद झाला
तू गेल्यानंतर मला तो बोलला
तुझ्या शब्दांचा स्पर्श त्याच्याही हृदयास झाला
प्रत्येक क्षण जगताना, अजूनही मी तिळतीळ मरतो आहे
मलाच कळत नाही, मी असे का वागतो आहे?
No comments:
Post a Comment