किती प्रेम होते नाही?
रोज गोड इमेल केलीच पाहिजे
फ़ुलवणारे उत्तर आलेच पाहिजे
दिवसातून पाच तरी लाडीक एस एम एस
पाचीच्या पाचींची स्वप्नवत उत्तरे
वेळ मिळाला की तासनतास फोनवर बोलायचे
शपथा घ्यायच्या, घ्यायला लावायच्या
मी तुझीच आहे म्हणायचे
'मी तुझाच आहे' म्हणायला लावायचे
तू मला सोडणार तर नाहीस ना ... विचारायचे
'असे वाटलेच कसे' असे ऐकायचे
महिन्यातून एखादी भेट
एखादी मिठी
हे सगळे घडवून आणायला
काय काय फिल्डिंग, काय काय सेटिंग
आज मला पार्लरला जायचय
आज मला उशीर होणार आहे
पुढच्या आठवड्यात दोन दिवस मला नाशिकला काम आहे
पुढे पुढे तर फारच वाढल प्रेम
बिनदिक्कत फोन
बिनदिक्कत उल्लेख
बिनदिक्कत खऱ्याचे खोटे
कुणी पाहू नये म्हणून मग
मोबाईल पूर्ण साफ केल्यावरच घरी यायचं
मेसेज बघितले तर सगळे वर्षभरापुर्वीचे
कॉळ बघितले तर सगळे कालचे, परवाचे
जसे काही आज कुणाशी बोलणेच झाले नाही
जसे आज कुणाचा मेसेज आलाच नाही
किती प्रेम! किती जपणूक! किती जीव उधळणे! किती जीव लावणे
इतके प्रेम केल्यावर माणसाला काय पाहिजे मग?
रात्री माझ्या मिठीत मात्र असे झोपायचे
जसे माझ्याइतके कुणी आवडतच नाही
चला
माझ्या मिठीत झोप तरी लागते हे काय कमी आहे का?
No comments:
Post a Comment