Feb 10, 2010

तुला पाहताच...



तुला पाहताच
तुझ्यातच हरवावे
तु गीत व्हावे
अन मी सुर व्हावे

माझ्या मनी
तुच स्मरावे
तुझ्या ओठी
मीच हसावे

माझ्या ओठांचा
तो लाडिक चाळा
नजरेनेच तु
परतुन द्यावा

लटक्या रागाने 
तु अबोल होता
काळीज माझे
क्षणभर थांबावे

मग मला बघुन
तु हळूच हसावे
तुझ्या हसण्यावर भाळून तेंव्हा
चंद्राने पण चिंब भिजावे

अशा मिलनाच्या
रात्री नेहमी घडाव्या
लज्जेच्या मग पडद्या आडुन
प्रितिचे ते फ़ूल हसावे

No comments:

Post a Comment