Feb 10, 2010

ती जेंव्हा नकळत हसते...


ती जेंव्हा नकळत हसते
ती खूपच सुंदर दिसते
मी लक्ष चुकवूनी बघतो
तरीही तिला ते कळते
मग राग आनुनी गालावर
ती क्षणातच रूसते

गालावरची खळी
क्षणात नाहीसी होते
चेहऱ्यावरची तेजी
पुसट व्हावयास येते
ती मणातुनच हसते
चेहऱ्यानेही लाल होते

तिला विचारले जेंव्हा
हा रुसवा कसला आहे
ती उगाच मूसमुसाते
आणि उगाच हट्टी होते
ती प्रेमाच्या ओल्यावाणे
पुन्हा खुषही होते

No comments:

Post a Comment