Oct 17, 2010

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव - १

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||

तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड
तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग
तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा
हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१||

12 comments:

  1. माझ्या जीवनातील माझी सर्वात आवडती कविता, त्यातील हे पहिले कडवे...

    ReplyDelete
  2. हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
    तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१||
    Sundar.. keep it up !!!

    ReplyDelete
  3. माझ्या हृदयात कोरलंय, फक्त तुझंच नाव
    तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव...

    ReplyDelete
  4. MITRA TODLAS REEEEEE..............LAI BHARI

    ReplyDelete
  5. very nice,,,,lovely.......

    ReplyDelete
  6. तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
    तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||

    ReplyDelete
  7. हेमंत नेटके पाटील .....

    तुझ्या मनात माझे गाव,माझ्या मनात तुझे नाव,
    तुझ्या टपोर डोळ्यात माझे इवलस गाव.

    ReplyDelete