कधीतरी वाटत यावा असा एक क्षण;
घेऊन एक संध्याकाळ श्यामल;
दूरून यावी झुळकत सुगंधित;
तुला घेऊन वायूची लहर.
मी अन् तू, तू अन् मी;
एकांताची भिंत सभोवती;
तो क्षण अवघा स्तब्ध असावा;
तुझ्या डोळ्यांत माझा विसावा.
जन्माला येणारा चंद्रही मग;
त्याच्या चांदणीसाठी झुरावा;
दाटून यावे मनी काहीसे;
न सांगताच तुला अर्थ कळावा.
श्वास माझा मी घ्यावा रोखून;
तुझ्या मनाची समजून घालमेल;
थांबवशील तू किती स्वतःला;
पण तुझ्या डोळ्यांना ते कसे जमेल.
काय कळेना कसे त्या क्षणी;
मला हवे ते तुला कळले;
तू देताना मला ते सारे;
मी तुझ्यातून नव्याने जन्माला यावे.
No comments:
Post a Comment