Feb 10, 2010

बसस्टॉपवरची मुलगी...


रोज सकाळी बसस्टॉपवर मला एक सुंदर मुलगी दिसायची
तिच्याकडे बघितल्यावर गालातल्या गालात हसायची

नजरेला नजर मिळाल्यावर हृद्याची धडधड वाढायची
स्वप्नांच्या रुळावर मनाची गाडी जोरात पळायची
कधी लो-वेस्ट जीन्स तर कधी पंजाबीतच असायची
पण कुठल्याही स्टाइलमध्ये ती तितकीच सुंदर दिसायची

स्टॉपवरची ती मुलगी मला खूप खूप आवडायची
पण तिच्याशी बोलायची हिंमतच नाही व्हायची
मग मनाशी निश्चय केला आज ही कोंडी फोडायची
मनातल्या गुपिताची गाठ तिच्यासमोर अलगद सोडायची

नेहमीचीच स्टाइल निवडली तिला प्रपोझ करायची
चॉकलेटस आणि फुले सुंदरशी तिला भेट म्हणून द्यायची
तिला प्रपोझ केल्यावर तिने पत्रिकाच दाखवली लग्नाची
आणि त्या पत्रिकेवर होती तारीख चारच दिवसानंतरची

म्हटले मनाशी मग मी ही नशिबातच नव्हती मिळायची
आता काय... उद्यापासून दुसरी कोणीतरी शोधायची
मग आठवले ऑफिसखालीही एक मुलगी रोज असायची
आणि ही सुद्धा त्या स्टॉपवरच्या मुलीइतकीच सुंदर दिसायची

No comments:

Post a Comment